Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना मोदी सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी; सिंगापूर दौऱ्यात खासदारांचा नेतृत्व!

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना मोदी सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी; सिंगापूर दौऱ्यात खासदारांचा नेतृत्व!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिंगापूर (Singapore) देशासोबत होणाऱ्या व्यावसायिक चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी खासदारांचा एक विशेष गट नेमण्यात आला असून, या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत. संसदीय डिप्लोमसीच्या या मोहिमेत विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेशही करण्यात आला आहे, ज्यामुळे ही जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरली आहे.

सुप्रिया सुळे सिंगापूर दौऱ्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय खासदार गटाच्या नेतृत्व करणार असून, महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांचा सहभाग राहणार आहे. त्याचबरोबर, इंडोनेशियासाठी श्रीकांत शिंदे, अर्जेंटिनासाठी अशोक चव्हाण, ब्राझीलसाठी प्रफुल्ल पटेल आणि मोरोक्कोसाठी अरविंद सावंत यांचा समावेश असणार आहे. केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व नरेश मस्के आणि संजय राऊत करणार आहेत. तर चिलेला रविंद्र वायकर, बाल्टिक्स दौऱ्यास वर्षा गायकवाड व श्रीरंग बारणे, ओमानसाठी एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, जपानसाठी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि इजिप्तसाठी राम गोपाल यादव यांचा समावेश राहणार आहे.

विरोधी पक्ष नेत्यांचा सहभाग सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील गटात विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याने संसदीय डिप्लोमसी अधिक सशक्त होणार आहे. काँग्रेसचे शशी थरूर (फ्रान्स), पी. चिदंबरम (इटली), के. सी. वेणुगोपाल (पोर्तुगाल), मनीष तिवारी (ऑस्ट्रेलिया) आणि गौरव गोगोई (फिलिपिन्स), डीएमकेचे के. कनिमोळी (ग्रीस), तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन (चिली) आणि अभिषेक बॅनर्जी (अल्जेरिया), शिवसेना-यूबीटीचे अरविंद सावंत (मोरोक्को) हेही गटात सामील आहेत. सुप्रिया सुळे यांना सिंगापूरसारख्या महत्त्वाच्या आर्थिक केंद्रासाठी खासदार गटाचे नेतृत्व देणे म्हणजे संसदीय डिप्लोमसी आणि भारताच्या व्यावसायिक हितांसाठी केंद्र सरकारकडून दिलेली उच्चस्तरीय जबाबदारी मानली जात आहे. या दौऱ्यात भारताचे व्यावसायिक संबंध मजबूत करण्याबरोबर, संसदीय सहकार्य वाढवण्यावर देखील भर असेल. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील हा गट भारताच्या बहुपक्षीय संसदीय सहकार्याचा एक मजबूत प्रतीक ठरणार आहे, ज्यामध्ये विरोधी पक्षांचे नेतेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com