Supriya Sule : कोट्यवधी रुपये खर्चून चांदनी चौकाचे रुप पालटले तरी...
पुण्यात वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक पुलाचे उद्धाटन 12 ऑगस्ट ला झाले. पुणे-बंगळुरु बायपासच्या हाय स्पीड वाहतुकीसह अनेक महत्त्वाचे रस्ते या चौकात एकत्र मिळतात. यामुळे चौकात सतत वाहतूक कोंडी होत असते. पुण्यात सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे चांदणी चौकात नवा उड्डाणपूल बांधण्याची योजना पुढे आली होती. पुण्यातील चांदणी चौक येथील रस्त्याचे काम पुर्ण झाले.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यातील चांदणी चौक येथील रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी मधून सुटका झाली नाही. दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांना अनेकदा दूरचा हेलपाटा पडत असल्याचे आढळून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून चांदनी चौकाचे रुप पालटले तरी पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो, हि वस्तुस्थिती आहे.
हे पाहता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती आहे की कृपया याठिकाणी येत असणाऱ्या अडचणींची एन एच ए आय च्या तज्ज्ञ पथकाकडून पाहणी करावी. यासह महापालिका पुणे, पोलीस खाते आणि प्रशासन यांच्या माध्यमातूनही अभ्यास करुन येथील त्रुटी निश्चित करुन त्या तातडीने दूर करण्याबाबत आपण संबंधित यंत्रणेला सुचना द्याव्यात. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.