उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज सुप्रिया सुळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाले की, बारामती लोकसभेत मला तीन वेळा मतदान करुन दिल्लीला पाठवले. यावेळी जो विश्वास सगळ्याच सगळ्याच सहकाऱ्यांनी, मित्रपक्षांनी जो माझ्यावर टाकलाय. त्याने जबाबदारी वाढलेली आहे. पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची संधी जी मला मिळाली आहे. त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष प्रेम दिलं, सहकार्य दिलं. त्यांचे मी मनापासून आभार मानते. माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही आहे. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे समोर कोण लढतंय याचा मी फारसा विचार करत नाही.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानते. कि ते एक गोष्ट कबूल करतात. शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. ते खरं बोललं याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सातत्याने चंद्रकांतदादा एकच गोष्ट बोलतात की, आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचे आहे. त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जाते. असं जे नाव गेले 6 दशकं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिलं. असं शरद पवार यांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आणि दुर्दैव आहे. शेवटी त्यांच्या मनातील आणि पोटातली गोष्ट बाहेर आली.

आरोप करायचे आणि पळून जायचं. शेवटी आज कोण कुठं उभं आहे, सातत्याने हे तेच बोलत राहतात. माझं म्हणणं आहे निवडणूक शरद पवार यांचे आहे का देशाच्या विकासाचं आहे. त्यांना शरद पवार यांच्याशिवाय दुसरं कुणी दिसतच नाही. एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे. गेले 10 दशकं पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाणं 6 दशकं टिकतंय ना. माझी कुणाशीच कधी नाती बिघडत नाहीत. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटते विरोधी पक्षातलं सर्वात जास्त वैयक्तिक चांगले संबंध कुणी जपलं असतील तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणि मी. त्याच्यामुळे आमचं निवडणूकीचं आणि वैयक्तिक नात्यांचं आमचा कधीच काही संबंध नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com