Supriya Sule : हे सरकार शेती आणि शेतकरी विरोधी सरकार आहे

Supriya Sule : हे सरकार शेती आणि शेतकरी विरोधी सरकार आहे

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे सरकार शेती आणि शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किंचितही उपाययोजना करण्यास हे सरकार तयार नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. खते, बियाण्यांच्या किंमती आस्मानाला भिडल्या आहेत.

दुसरीकडे सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी मात्र तब्बल दहा पटीने वाढवली. शिवाय कृषीपंपांना मीटर देखील बसविण्यात येणार आहेत. हि शेतकऱ्यांची लूट असून आम्ही सर्वजण याचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोडून पडला आहे. त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी मी वारंवार संसदेसह विविध माध्यमातून केली आहे. शेतकऱ्यांना किंचितही दिलासा देण्यास हे सरकार तयार नाही उलट त्यांचे अधिकाधिक शोषण कसे करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याला त्यांचे प्राधान्य आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com