Chandrakant Patil, Supriya Sule
Chandrakant Patil, Supriya SuleTeam Lokshahi

सुप्रियाताई तुम्ही काळजी करु नका, हे प्रशासन...; चंद्रकांत पाटलांचा टोला

प्रशासन अतिशय व्यवस्थीत सुरु आहे. तूम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता, त्यामुळे सुप्रिया ताई म्हणाल्या दोन दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला.

अमझद खान | कल्याण : प्रशासन अतिशय व्यवस्थित सुरु आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता, त्यामुळे सुप्रिया ताई म्हणाल्या दोन दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. ताई तुम्ही काळजी नका करु. हे सरकार पण चालवित आहे आणि फिरत पण आहेत, असा टोला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने परिसरातील कीर्तनकारांचा जाहिर सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काहीनाकाही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी सोशल मीडियावर पाठवला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होते.

यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रशासन अतिशय व्यवस्थित सुरु आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता, त्यामुळे सुप्रिया ताई म्हणाल्या दोन दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. ताई तुम्ही काळजी नका करु. हे सरकार पण चालवित आहे आणि फिरत पण आहेत, असा निशाणा त्यांनी सुप्रिया सुळेंवर साधला आहे.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणासोबत स्कील डेव्हलमेंटवर भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना फंड देऊ. अतिशय दुर्गम भागात संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी शिक्षण संस्था उभी केली. या भागातील विद्यार्थांची गरज पाहता या भागाला लॉ कॉलेज दिले आहे. ग्रामीण भागात आर्टस सायन्स, बीएस्सीचे शिक्षण घेऊन काय होणार नाही. ती एक समाजाची छोटी गरज आहे. या विषयांचे ज्ञान आणि त्याला स्कील डेव्हलमेटंची जोड दिल्यास एका बाजूने तरुण बुद्धीमान होईल तर दुस:या बाजूने त्याला रोजगारला कौशल्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Chandrakant Patil, Supriya Sule
'2024ला उध्दव ठाकरे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार, म्हणूनच भाजपने सत्तातंर घडवले'

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com