Suresh Raina
Suresh Raina

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला का हटवलं? सुरैश रैनानं थेट सांगितलं, म्हणाला; "याचे परिणाम..."

मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करण्याचं सत्रच सुरु केलं. गेल्या काही दिवसांपासून याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहेत. अशातच आता भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनानं मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यामध्ये तीन सामन्यांत विजय तर चार सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे. परंतु, आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवलं आणि त्याच्या जागेवर हार्दिक पंड्याला कॅप्टन्सीची संधी मिळाली.

त्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल करण्याचं सत्रच सुरु केलं. गेल्या काही दिवसांपासून याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहेत. अशातच आता भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनानं मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

इथे पाहा व्हिडीओ

सुरेश रैना काय म्हणाला?

मिस्टर आयपीएल सुरेश रैनानं लल्लनटॉपला मुलाखत देत म्हटलंय की, रोहित शर्मालाच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती. रोहितने मुंबईला पाचवेळा जेतेपद जिंकवून दिलं आहे. परंतु, टीम मॅनेजमेंटने हा निर्णय का घेतला, यामागे काय हेतू होता, याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही. युवा खेळाडूला संधी देण्याचा त्यांचा मानस असू शकतो. पण, या निर्णयाचे परिणाम काय होतील, हे भविष्यात समजेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com