Sushma Andhare : ...आणि काश्मीरवरून परतलेल्या मैत्रिणीला पाहून सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या

Sushma Andhare : ...आणि काश्मीरवरून परतलेल्या मैत्रिणीला पाहून सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यादेखील सहकुटुंब काश्मीरमध्ये होत्या.
Published by :
Rashmi Mane
Published on

पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यात २७ नागरिकांनी आपला जीव गमावला, तर अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडले. भारतातील विविध राज्यातून पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यादेखील सहकुटुंब काश्मीरमध्ये होत्या. दहशतावादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी काश्मीरमधून एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये रुपाली यांनी आपण सुखरूप असून तेथील परिस्थितीची माहिती दिली होती. दरम्यान, गुरुवार, २४ एप्रिल रोजी रुपाली ठोंबरे सहकुटुंब महाराष्ट्रात परतल्या असून विमानतळावर त्यांच्या आप्तेष्टांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यादेखी उपस्थित होत्या. आपल्या प्रिय मैत्रिणीला पाहून सुषमा अंधारे ढसा ढसा रडल्या.

रुपाली ठोंबरे येताच सुषमा अंधारेंना रडू कोसळलं. तर रुपाली यांनीही पुढे येऊन सुषमा यांना घट्ट मिठी मारली. आपल्या मैत्रिणीला रुपाली यांनी धीर दिला. त्यावेळी रुपाली ठोंबरेदेखील भावूक झाल्या. एक महायुती गटातील तर एक महाविकास आघाडीतील कार्यकर्ती मात्र एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी. अशा कठिणप्रसंगी राजकारणातील हेवेदावे बाजूला ठेवून केवळ दोन मैत्रिणी कडकडून भेटल्या असल्याने त्यावर प्रतिक्रिया देणारेही संवेदनशीलतेने बोलत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com