Sushma Andhare : टँकरमाफिया कोणाच्या आशीर्वादाने पुणेकरांच्या जीवाशी खेळतयं?; दुषीत पाणीपुरवठ्यावर सुषमा अंधारेंचा सवाल

मुजोर टँकर माफियांकडून नागरिकांना मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा पुणे महानगरपालिका करत आहे.
Published by :
Rashmi Mane

पुण्यात टँकर माफियांचा पुणेकर नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. मुजोर टँकर माफियांकडून नागरिकांना मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा पुणे महानगरपालिका करत आहे. या प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केलं असून दिवसाढवळ्या दुषित पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे. मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा पुण्यातील खराडी आणि विमाननगर भागातील सोसायट्यांमध्ये केला जात असून यामुळे लाखो रहिवाशांच्या जीविताशी खेळ केला जात आहे. विहिरीचे पाणी म्हणून दुषित पाणी या सोसायट्यांना दिले जात आहे.

यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या की, "पुण्यात सध्या अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अजून दीड ते दोन महिने आपल्याला पाण्याची साठवणूक करायची आहे. य सगळ्यांमध्ये टँकर माफियांचा जो सुळसुळाट सुरू आहे. टँकर माफिया ज्या पद्धतीने पाणी देत आहेत. यामध्ये इत्येक सोसायट्यांमध्ये अंत्यत गलिच्छ, शेवाळलेलं पाणी आणि त्यात निर्जंतुकीकरण न केलेलं पाणी तसचं दिलं जातयं. पालिकेने या सर्व गोष्टींवरील प्रतिबंध वाढवला पाहिजे. पालिकेने सर्व गोष्टींना आळा घातला पाहिजे. टँकर माफिया कोणाच्या आशिर्वादाने हे करतात. यावर न शासनाची न पोलिसांची कोणाचीही पकड नाही. टँकरमाफियांची मनमानी पद्धतीनं काम सुरू ते अत्यंत वाईट आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या हा टँकरमाफियांचा अत्यंत अशुद्ध पाणी पुरवठ्याचा खेळ सुरू आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com