Sushma Andhare : 'मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार'; सुषमा अंधारेंनी केली आकडेवारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्या सुरू असलेल्या विविध घटनांवर भाष्य केले. त्यांनी प्रामुख्याने मराठा समाजासाठीच्या आरक्षणासाठी सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या आयोगामधील भ्रष्टाचारावर सविस्तर माहिती दिली. मराठा समाजासाठी नेमण्यात आलेल्या आयोगामागे तब्बल 367 कोटी 12 लाख 89 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांनी माहिती दिली की, "मराठा आरक्षण एक गंभीर प्रश्न म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला. त्यासाठी आयोग नेमला, पण काहीही झालं नाही. मराठा समाजाला खेळवत ठेवलं जातय का?, आमच्याकडे मराठा समाज्याची फसवणूक सुरु आहे, त्याची माहिती आहे. मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली. शासनाने अभ्यास करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली गेली. त्यानुसार 367 कोटी 12 लाख 89 हजार निधी उपलब्ध करून दिला. सुनील शुक्रे आज पुण्यात आहेत. vvip हाऊसला त्यांची बैठक सुरु आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारावा. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शिर्के यांनी त्यांच्या कामासाठी सहाय्यक प्रतिनियुक्ती मागितली. मंत्रालयातील उपसचिव पदावर असणाऱ्या आशाराणी पाटील यांची नियुक्ती जलसंपदा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नोटिंग वरून झाली आहे, असा जीआर निघाला. वास्तविक आशाराणी पाटील या अल्पसंख्यांक तथा मागास कल्याण खात्याच्या उपसचिव आहेत," असे अंधारे म्हणाल्या.