Sushma Andhare :  मुख्यमंत्र्यांनी बोर्ड लावावा, येथे क्लिन चीट वाटून मिळतील…अंधारेंचा हल्लबोल

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांनी बोर्ड लावावा, येथे क्लिन चीट वाटून मिळतील…अंधारेंचा हल्लबोल

फलटण महिला डॉक्टर प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नावही या प्रकरणात घेतले जात होते,
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • मुख्यमंत्र्यांनी बोर्ड लावावा, येथे क्लिन चीट वाटून मिळतील…

  • अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

  • आम्हाला सीडीआर मिळाला नाही

फलटण महिला डॉक्टर प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नावही या प्रकरणात घेतले जात होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील सभेत निंबाळकर यांनी क्लीनचीट दिली होती. यावरून आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं आहे. अंधारे नेमकं काय म्हणाल्या याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

मुख्यमंत्र्यांना डिवचताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री हे या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. पण त्यांनी न्यायाधीशाच्या खुडच्यावर बसू नये. हा त्यांचा जॉब नाही. तुमचा कार्यालयाचा बाहेर बोर्ड लावावा की येथे क्लीन चीट वाटून मिळतील. आमचा गावात 34 रणतित निंबाळकर आहेत असं त्यांनी 34 निंबाळकर तिथे आहेत तर ते 33 कोण आहेत याचा शोध घ्यावा.’

आम्हाला सीडीआर मिळाला नाही

सुषमा अंधारे यांनी सुरवातीला म्हटले की, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या वस्तू जप्त केल्या जातात. लॅपटॉप, फोन आणि इतर गोष्टी सील केल्या जातात आणि त्याची माहिती गोपनीय ठेवली जाते. या वस्तू न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयासमोर उघडायच्या असतात. आम्ही रणजितसिंह निंबाळकर यांच्या महाडिक यांच्यात काही संवाद झाला का? महाडिक आणि धुमाळ यांच्यात संवाद झाला आहे का? याची सीडीआरची मागणी करत आहोत, मात्र याबाबत कोणतीही माहिती पुढे येत नाहीये.

पोलीसांवर गंभीर आरोप

पोलीसांवर आरोप करताना अंधारे म्हणाल्या की, काल निंबाळकर यांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या. त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितले नाही. पण मुलीच्या सीडीआरबद्दल बोलल्या. आता मला पोलीसांना प्रश्न विचारायचा आहे की. पोलीसांना त्या मुलीचा मोबाईल आणि तिचं सीडीआर लीक करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्नही अंधारे यांनी विचारला आहे. पुढे बोलताना अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांनी कोणत्या अधिकाराच्या खाली सीडीआरबद्दल भाष्य केलं असा सवाल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com