Shah Rukh Khan House: सैफच्या आधी शाहरुख टार्गेटवर! किंग खानच्या मन्नतभोवती संशयास्पद हालचाली
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर बॉलीवुड हादरलं आहे. अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्रा येथील घरी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री हल्लेखोर घुसला. हल्लेखोराबरोबर झालेल्या झटापटीत सैफवर हल्लेखोराने धारदार चाकूने वार केले, त्यामुळेया हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. ज्यामुळे त्याला मध्यरात्री लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सैफवर झालेल्या हल्ल्यामुळे सैफ अली खानचे संपुर्ण कुटुंबीय चिंतेत आहेत. तर सैफचं हल्ला प्रकरण सुरु असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफच्या आधी बॉलिवूडचा किंग खान हा टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला होण्याआधी अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याभोवती संशयास्पद हालचाली आढळून आल्या.
बॉलीवूडचा किंग अभिनेता शाहरुख खानच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं आहे. शाहरुखच्या मन्नत बंगल्यात गेल्या 2 ते 3 तीन दिवसांपूर्वी एकाने घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शाहरुखच्या मन्नत बंगल्याच्या भिंतीवर जाळी असल्यामुळे त्या अज्ञात व्यक्तीचा आत घुसण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.
सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र घरात घुसण्यामागचं नेमक कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील सिनेसृष्टीत सध्या खळबळ माजली आहे. सैफच्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर आता शाहरुख खानच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.