Swine Flu : पुण्यात डेंग्यू,स्वाइन फ्लूचा धोका वाढला

Swine Flu : पुण्यात डेंग्यू,स्वाइन फ्लूचा धोका वाढला

कोरोनानंतर पुण्यात आता स्वाइन फ्लू ( Swine Flu) आणि डेंग्यू (Dengue) या साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

अमोल धर्माधिकारी |पुणे : कोरोनानंतर पुण्यात आता स्वाइन फ्लू ( Swine Flu) आणि डेंग्यू (Dengue) या साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सातत्याने वातावरणात होणारे बदल यामुळे घरो घरी सर्दी, ताप, खोखला असणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतेय. स्वाइन फ्लू आणि डेंग्यू दोन्ही आजारांची आकडेवारीआता समोर आली आहे.

Swine Flu : पुण्यात डेंग्यू,स्वाइन फ्लूचा धोका वाढला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटांची भेट

पुणे शहरात जुलै महिन्यामध्ये स्वाईन फ्लू या आजाराच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.१ जानेवारी पासून ते आजच्या दिवसापर्यंत स्वाइन फ्लूचे तब्बल ४५ रुग्ण पुण्याचा सापडले आहेत. १ जुलै ते २६ जुलैमध्ये यापैकी सर्वाधिक म्हणजेच २२ रुग्ण स्वाइन फ्लूचे आढळले असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे.त्यामुळे पुणेकरांनो काळजी अजूनही मास्क घाला. सर्दी,ताप असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका अस आवाहन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com