Swine Flu : चिंता वाढली; राज्यात दीड महिन्यात ‘स्वाइन फ्लू’चे 52 रुग्ण

Swine Flu : चिंता वाढली; राज्यात दीड महिन्यात ‘स्वाइन फ्लू’चे 52 रुग्ण

राज्यात आता पुन्हा एकदा ‘स्वाइन फ्लू’ने डोकं वर काढलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात आता पुन्हा एकदा ‘स्वाइन फ्लू’ने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता चिंता वाढली आहे. राज्यात दीड महिन्यात ‘स्वाइन फ्लू’चे 52 रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे.

‘स्वाइन फ्लू’चे सर्वाधिक रुग्ण नागपूर व बृहन्मुंबई महापालिका हद्दीत आढळले असून नागपुरात 12, तर मुंबईत 10 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात 1 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025दरम्यान स्वाइन फ्लूचे 52 रुग्ण आढळले. त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com