Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता…’मधील सोनूने सांगितला तिच्या आयुष्यातील 'तो' कठीण प्रवास
तारक मेहता का उल्टा चष्मा या गाजलेल्या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या आयुष्यात आलेल्या गंभीर आजाराबद्दल मन मोकळं केलं.
निधीने सांगितलं की, शाळेत दहावीत असतानाच ती अभिनय करत होती. अभ्यास, क्लासेस आणि शूटिंग यामुळे तिच्यावर प्रचंड मानसिक ताण होता. सतत थकवा आणि झोप येतेय असं ती बोलायची. मात्र त्या शब्दांचा असा परिणाम होईल, याची तिला कल्पनाही नव्हती.
दहावीची परीक्षा संपल्यानंतर होळी साजरी केल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडली. एका संसर्गामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि तिला ‘बॅक्टेरियल मेनिंजायटिस’ झाला. त्या काळात ती काही दिवस कोमामध्ये होती.
तेव्हा तिचं वय फक्त 14 वर्षांचं होतं. चार महिने रुग्णालयात उपचार सुरू होते आणि पूर्णपणे सावरायला सहा महिने लागले. चालणं, बोलणं, रोजच्या सवयी पुन्हा शिकाव्या लागल्या. या काळात सकारात्मक विचारच तिला सावरायला मदत करत होते, असं तिनं सांगितलं. निधीचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
थोडक्यात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री
निधी भानुशाली पुन्हा एकदा चर्चेत
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयुष्यावर भाष्य
तिच्या आयुष्यात आलेल्या गंभीर आजाराचा खुलासा...
पहिल्यांदाच मन मोकळं करून अनुभव शेअर केला.

