Tahawwur Rana
Tahawwur Rana

Tahawwur Rana : मुंबई 26/11 हल्ल्याच्या सूत्रधार तहव्वूर राणाचे कॅनडियन नागरिकत्व रद्द होणार

तहव्वूर राणाला भारतात आणलं गेले असून तो सध्या भारतात तुरूंगात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Tahawwur Rana) तहव्वूर राणाला भारतात आणलं गेले असून तो सध्या भारतात तुरूंगात आहे. 2001 मध्ये तहव्वूर राणाला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते. मात्र यावेळी 2000 साली त्याने नागरिकत्वासाठी अर्ज केला तेव्हा त्याने गेल्या चार वर्षांपासून ओटावा आणि टोरंटोमध्ये राहण्याचा दावा केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार तहव्वूर राणा नागरिकत्वासाठी अर्ज करताना खोटे बोलला होता आणि त्याने केलेला दावाही खोटा ठरला. यातच आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्याच्याआधी ते मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. कॅनडा 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचे नागरिकत्व रद्द करणार असल्याची माहिती मिळत असून याबाबत तहव्वूर राणाला कॅनडाच्या सरकारने माहिती दिली आहे.

Summary

  • मुंबई 26/11 हल्ल्याच्या सूत्रधाराला कॅनडा देशाबाहेर हाकलणार

  • कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार

  • तहव्वूर राणाचे कॅनडा नागरिकत्व रद्द होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com