माजी जीप अध्यक्षावर कारवाई करा,फंडाला नाव देणं पडणार महागात? काँग्रेसची सीइओंकडे निवेदनातून मागणी

माजी जीप अध्यक्षावर कारवाई करा,फंडाला नाव देणं पडणार महागात? काँग्रेसची सीइओंकडे निवेदनातून मागणी

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील 17 सामूहिक फंडाला चक्क सरिता विजय गाखरे निधी अंतर्गत नामांतरण करून फलक लावण्यात आले.

भूपेश बारंगे, वर्धा

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील 17 सामूहिक फंडाला चक्क सरिता विजय गाखरे निधी अंतर्गत नामांतरण करून फलक लावण्यात आले.याबाबत लोकशाहीने वृत्त प्रकाशित करताच तालुका काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी घुगे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कारंजा तालुक्यातील आठ गावात 17 सामूहिक विकास फंड अंतर्गत रस्त्याचे बांधकाम मंजूर करण्यात आले. त्या कामाचे काही दिवसांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आठही गावात फलक लावण्यात आले,त्यावर चक्क फंडाचे नाव बदलवून सरिता विजय गाखरे अध्यक्ष निधी असे स्वतःचे नाव लिहण्यात आले. त्या फलकावर कोणत्या वर्षी काम मंजूर झाले त्या वर्षाचा उल्लेख केला नाही.यामुळे सर्वाना आश्चर्य धक्का बसला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असूनही श्रेय लाटण्यासाठी नागरिकांची सर्रास दिशाभूल केली जात असल्याचे निष्पन्न होत आहे. हा सर्रास पदाचा दुरुपयोग असून मनमानी कारभार केला जात आहे. असा आरोप माजी जीप सदस्यांनी केला आहे.या प्रकरणात सखोल चौकशी करून माजी जीप अध्यक्षावर कारवाई करण्यासाठी कारंजा पंचायत समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोशन घुगे आले असता त्यांना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष टिकराम चौधरी, टिकाराम घागरे, छोटू कामडी,भगवान बोवाडे, राजेश लाडके, जयसिंग गाडगे, गजानन कामडी यांनी दिले.या प्रकरणात काय कारवाई जीपचे सीईओ करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी जीप अध्यक्षाच्या पतीच्या ढवळाढवळ सुरूच

जिल्हा परिषद मध्ये 50 टक्के महिलांचे सदस्य असते त्यात अनेक महिला नव्याने आल्याने त्यांचे पतीदेवच जिल्हा परिषदेत कारभार केला जात असतो.आतापर्यंत अनेक महिला जीप अध्यक्ष यांनी कारभार सांभाळला त्यात पतीदेव यांची ढवळाढवळ आढळून येत असताना जिल्हा परिषदेचे काही विभाग त्रस्त होऊन गेले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पाणी पुरवठा विभागात पाणी मुरवण्याचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे.

पतीदेवाच्या कार्यालयातील लुडबुडला आळा घाला!

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला असला तरी काही महिला माजी पदाधिकाऱ्यांच्या पतीदेव आताही जिल्हा परिषद कार्यालयातील अनेक विभागात राजकीय दबावतंत्र वापरून ढवळाढवळ केली जात असून भ्रष्टाचार करण्याकरिता प्रवृत्त केले जात असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवरून कर्मचारी सांगतात. यामुळे अश्या पतीदेवला आळा घालण्यासाठी नव्याने आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रयत्न करतील का?

जिल्हा परिषदेच्या सीसीटीव्ही ठिय्या कैद?

जिल्हा परिषदमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत अनेक पतीदेव कार्यलयातील विभागात ढवळाढवळ केले जात असून ठिय्याचे चित्र कैद झाले असल्याचे सांगण्यात येते.कार्यालयातील सीसीटीव्हीचा शोध घेतल्यास कोणकोण या कार्यलयात ढवळाढवळ करतात ते दिसून येणार आहे.याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com