Tansa Lake Overflow : दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाडू लागला

Tansa Lake Overflow : दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाडू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाडू लागला आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोर धरला आहे. कमी, मध्यम, मुसळधार प्रमाणात पाऊस बरसतं आहे. परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाडू लागला आहे. बुधवारी सायंकाळपासून तानसा तलाव भरला आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात 86 टक्के पाणी पुरवठा झाल्याची दिलासादायक माहिती समोर येत आहे.

मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जलाशयातील पाणी पातळी वाढली असून उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी यातील धरणातील पाणीसाठा 86.88 टक्के झाला आहे.

दरम्यान, राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. मुंबई व उपनगरात, ठाणे आणि पालघरमध्येही पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून आज, 24 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Tansa Lake Overflow : दिलासादायक! मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाडू लागला
Maharashtra Heavy Rain Alert : पुढील 5 दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज काय?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com