एकीकडे अवकाळीचं सावट तर दुसरीकडे वाढता उष्मा
Admin

एकीकडे अवकाळीचं सावट तर दुसरीकडे वाढता उष्मा

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच मुंबईत मात्र उष्णता चांगलीच वाढली आहे.

दोन दिवसांपासून उकाड्याची जाणीव अधिक तीव्र झालेली असताना गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान बुधवारपेक्षा दोन अंशांनी अधिक वाढले. हे तापमान पुढील दोन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असताना मुंबईत मात्र उष्णता वाढली आहे. पुढील दोन दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसांत गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. येत्या चार दिवसांत राज्यात 9 एप्रिलपर्यंत मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com