Nagpur Winter
Nagpur Winter Nagpur Winter

Nagpur Winter : नागपूर थंडीने गारठले! तापमान चक्क 7.6 अंशावर, पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

Temperatures Are Decreasing In Nagpur : गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. पहाटे आणि रात्रीचा गारठा इतका वाढला आहे की नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Temperatures Are Decreasing In Nagpur : गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. पहाटे आणि रात्रीचा गारठा इतका वाढला आहे की नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दिवसा थोडा ऊन दिलासा देत असले तरी तापमान सतत घसरत असल्याने थंडीची तीव्रता कायम आहे. ढगाळ हवामानानंतर थोडी कमी झालेली थंडी पुन्हा जोरात परतली आहे.

नागपूरमध्ये मंगळवारी किमान तापमान थेट 7 अंशांच्या आसपास घसरले. अवघ्या एका दिवसात तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा फटका अधिक जाणवू लागला आहे. रस्त्यांवर लोक जाड कपडे घालून फिरताना दिसत असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब घेतली जात आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही थंडी 12 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. आकाश स्वच्छ राहणार असून रात्रीचे तापमान कमी आणि दिवसाचे तापमान मध्यम राहण्याची शक्यता आहे. तापमान झपाट्याने खाली येत असल्याने जुन्या थंडीच्या नोंदी मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही काही वर्षांत नागपूरमध्ये तीव्र गारठा अनुभवायला मिळाला होता.

दरम्यान, पुण्यातही यंदाचा हिवाळा चांगलाच बोचरा ठरला आहे. डिसेंबर महिन्यात अनेक दिवस तापमान एक अंकी राहिले असून गेल्या दशकातील सर्वाधिक थंड डिसेंबर म्हणून यंदाची नोंद होत आहे. राज्यभरात थंडीने नागरिकांची चांगलीच परीक्षा घेतली आहे.

थोडक्यात

  • गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचा जोर वाढला आहे.

  • पहाटे आणि रात्री गारठा वाढल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

  • दिवसा थोडे ऊन मिळत असले तरी तापमान सतत घसरत आहे.

  • ढगाळ हवामानानंतर थंडी काहीशी कमी झाली होती, मात्र आता पुन्हा वाढली आहे.

  • थंडीची तीव्रता कायम असल्याने नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com