Kanpur Crime : 'आय लव्ह मोहम्मद' घोषणेवरून वाद; कानपूरमध्ये FIR
Kanpur Crime : 'आय लव्ह मोहम्मद' घोषणेवरून वाद; कानपूरमध्ये FIR, बरेलीत फतवाKanpur Crime : 'आय लव्ह मोहम्मद' घोषणेवरून वाद; कानपूरमध्ये FIR, बरेलीत फतवा

Kanpur Crime : 'आय लव्ह मोहम्मद' घोषणेवरून वाद; कानपूरमध्ये FIR, बरेलीत फतवा

कानपूर वाद: 'आय लव्ह मोहम्मद' बोर्डामुळे तणाव, FIR दाखल
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • कानपूरमध्ये झालेल्या जुलूस-ए-मोहम्मदी दरम्यान ट्रॅक्टरवर लावलेल्या “I Love मोहम्मद” या बोर्डामुळे तणाव निर्माण

  • रावतपुरातील सैय्यद नगर भागात रामनवमी शोभायात्रेच्या गेटसमोर हा बोर्ड लावल्याने दोन गट आमने-सामने

  • एसीपी रंजीत कुमार यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली

कानपूरमध्ये झालेल्या जुलूस-ए-मोहम्मदी दरम्यान ट्रॅक्टरवर लावलेल्या “I Love मोहम्मद” या बोर्डामुळे तणाव निर्माण झाला. रावतपुरातील सैय्यद नगर भागात रामनवमी शोभायात्रेच्या गेटसमोर हा बोर्ड लावल्याने दोन गट आमने-सामने आले. एसीपी रंजीत कुमार यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र हिंदूवादी संघटनांनी बोर्ड काढण्याची मागणी केली.

या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे 25 मुस्लिम युवकांवर एफआयआर दाखल केला. यावर बरेलीतील दरगाह आला हजरत तसेच जमात रजा-ए-मुस्तफा संघटनेने तीव्र विरोध दर्शवला.

संघटनेचे राष्ट्रीय महासचिव फरमान हसन खान यांनी हे प्रकरण संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, “आई लव मोहम्मद” असे लिहिणे हा कोणत्याही अर्थाने गुन्हा नाही, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा कणा आहे.

खान यांनी संविधानातील कलम 19(1)(a) (अभिव्यक्ती स्वातंत्र्य), कलम 25 (धर्मस्वातंत्र्य) आणि कलम 21 (वैयक्तिक स्वातंत्र्य) यांचा दाखला देत एफआयआर मागे घेण्याची मागणी केली. तसेच मेनका गांधी विरुद्ध यूनियन ऑफ इंडिया या खटल्याचा संदर्भ देत धार्मिक श्रद्धा व प्रेम व्यक्त करण्यावर कोणतेही बंधन घालता येणार नाही, असे स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com