Andhra Pradesh Bus Accident : आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात; खासगी बस दरीत कोसळून 10 प्रवाशांचा मृत्यू, 23 जण जखमी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Andhra Pradesh Bus Accident ) आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू आणि 23 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. चित्तूर जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील मरेडुमिल्ली घाटातून जात असताना पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
खासगी बस दरीत कोसळून हा अपघात झाला. बसमधून एकूण 37 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी मदतकार्य सुरू केले. पोलीस, बचाव पथक व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Summery
आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात
खासगी बस दरीत कोसळून 10 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जण जखमी
पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती
