Jalgaon Accident : कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jalgaon Accident) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात झाला. उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा कन्नड घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
Summary
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात
उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा कन्नड घाटात भीषण अपघात
घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
