Madhya pradesh Accident
बातम्या
मध्यप्रदेशच्या रिवामध्ये भीषण अपघात 14 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय राजमार्गावर 30 वर भीषण अपघात झाला. तीन वाहनांची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या ( Madhya Pradesh ) सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय राजमार्गावर 30 वर भीषण अपघात झाला. तीन वाहनांची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला.
अपघातात 14 जणांचा मृत्यू आणि 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री उशीरा झाला. ही बस जबलपुरहून रीवा मार्गे प्रयागराजला जात होती.
हा अपघात झाल्यानंतर माहिती मिळताच तात्काळ सोहागी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना त्योंथर सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे.