Accident
थोडक्यात
नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात
कारची डंपरला जोरदार धडक
गाडीचं नियंत्रण सुटल्याने अपघात
(Accident) अटल सेतूवर भीषण अपघात झाला असून या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. अटल सेतूवरून शिवडीला जात असताना एका कारचा डंपरला धडकून हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. कारमध्ये असणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
कार चालक बचावला आहे. गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट अटल सेतूवरुन खाली येत असताना पाठीमागून डंपरला धडकली.