बातम्या
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 7 ते 8 वाहनांची धडक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे.
भारत गोरेगावकर, रायगड
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. 7 ते 8 वाहनं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. खोपोली एक्झिटजवळ वाहनं एकमेकांवर आदळली आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रकचा समावेश असून अपघातात काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर खोपोली पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील खोपीलीजवळील एक्झिट जवळ हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या.