ChatGPT : Elon Musk , आर्यभट्ट यांचेही आधार आणि पॅनकार्ड ? नक्की काय आहे प्रकार ?
सध्या ChatGPT चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे अनेक क्षेत्रामध्ये फायदा होत आहे. ChatGPT चा सध्या Ghibli Image Feature चांगलेच चर्चेत राहिले. मात्र याचा गैरवापरदेखील होताना दिसून येत आहे. आता ChatGPT चा वापर करुन नकली आधार कार्डदेखील बनवले जात आहेत. सोशल मीडियावर असे खोटे आधार कार्डचे फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ChatGPTचा वाढता गैरवापर मोठा चिंतेचा विषय ठरला आहे.
ChatGPT च्या माध्यमातून खोटे आधार कार्ड बनवण्यात आले आहेत. यामध्ये OpneAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांचे खोटे आधारकार्ड बनवल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान हा प्रकार केवळ आधार कार्डपर्यंत मर्यादित राहिला नसून अनेक लोकांनी याचा वापर खोटे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्डचे फोटोदेखील तयार करणार आल्याचे समोर आले आहे.
एका न्यूज वेबसाइटने दावा केला आहे की जेव्हा त्यांनी ChatGPT सोबत आधार कार्डची इमेज ट्राय केली तेव्हा ती तयार होती. अशा अनेक प्रतिमा सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत, ज्यामध्ये लोकांनी एआय टूल्सद्वारे त्यांचे ओळखपत्र बनवल्याचा दावा केला आहे.
चिंतेची बाब म्हणजे आधार कार्ड ट्रॅक करता येईल. बॅक-एंड सिस्टमद्वारे फेशियल डेटा क्रॉस चेक केला जाऊ शकतो, परंतु पॅन कार्ड आणि डीएलच्या बाबतीत, सरकारी आयडीची क्रॉस चेकिंग कठीण होऊ शकते. अशा स्थितीत त्याचा गैरवापर झाल्यास सुरक्षेची चिंता वाढू शकते.