ठाकरे - शिंदेंचे सूत जुळले; 8 तारखेला पार पडणार मोठा सोहळा

ठाकरे - शिंदेंचे सूत जुळले; 8 तारखेला पार पडणार मोठा सोहळा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय व दसरा मेळाव्याची चालु असलेली राजकीय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा दररोजचा सामना पहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय व दसरा मेळाव्याची चालु असलेली राजकीय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा दररोजचा सामना पहायला मिळत असताना जुन्नर तालुक्यातील एका लग्नपत्रिकेने साऱ्यांचे लक्ष लागले आहे. हे ठाकरे शिंदे राजकारणातील ठाकरे शिंदे नसून जुन्नरमधील ठाकरे - शिंदे आहेत.

जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख व सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक श्री खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल व आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि . सौ .का . अनुराधा यांचा शुभविवाह दि . ८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.सध्या सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होतेय.

त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकिय तणावाच्या वातावरणात ही लग्नपत्रिका पाहून चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत असून रमेश शिंदे आणि अनुराधा ठाकरे येत्या 8 तारखेला लग्नगाठ बांधणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com