ताज्या बातम्या
Mahendra Dalvi : तटकरेंच्या रुपात घरातच शत्रू, महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरेंवर निशाणा
ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला.
ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात पैशांसह आमदार दिसत असल्याचे त्यांनी आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या व्हिडिओत दिसणारे आमदार शिंदेसेनेचे महेंद्र दळवी आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, 'पुरावे असतील दाखवा'आरोप खरे ठरले तर राजीनामा देईल' दानवेंचे आरोप महेंद्र दळवींनी फेटाळले आहेत. दानवेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, दळवींचा इशारा दिला.
थोडक्यात
'पुरावे असतील दाखवा'....'आरोप खरे ठरले तर राजीनामा देईल'...
दानवेंचे आरोप महेंद्र दळवींनी फेटाळले....
दानवेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, दळवींचा इशारा
