Shiv Sena UBT on Jain Muni : जैन मुनींच्या आरोपांवर ठाकरे गटाचा पलटवार
Shiv Sena UBT on Jain Muni : जैन मुनींच्या आरोपांवर ठाकरे गटाचा पलटवार; मुंबईच्या शांततेला धोका देणाऱ्यांना इशाराShiv Sena UBT on Jain Muni : जैन मुनींच्या आरोपांवर ठाकरे गटाचा पलटवार; मुंबईच्या शांततेला धोका देणाऱ्यांना इशारा

Shiv Sena UBT on Jain Muni : जैन मुनींच्या आरोपांवर ठाकरे गटाचा पलटवार; मुंबईच्या शांततेला धोका देणाऱ्यांना इशारा

लालबाग क्षेत्रात उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व असल्याचं सांगत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही कुठल्याही नेत्याला फोन केला, तर तो तुमच्याकडे येणार नाही.
Published by :
Riddhi Vanne
Published on

लालबाग क्षेत्रात उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व असल्याचं सांगत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही कुठल्याही नेत्याला फोन केला, तर तो तुमच्याकडे येणार नाही. त्यांच्या आमदार, खासदार, नगरसेवक या सर्वांना तुमच्या समस्येची पर्वाह नाही आणि ते चापट मारून मतदान करण्यासाठी तुम्हाला सांगतील, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

त्याचप्रमाणे, राज ठाकरे यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेना जशी चिकनच्या मुद्द्यांमध्ये अडकून राहिली, तसंच तुम्ही देखील त्याच प्रकारे अप्रासंगिक ठराल. यावर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी जैन मुनींच्या आरोपांचा जोरदार प्रतिवाद केला आहे. अखिल चित्रे यांनी जैन मुनींचा एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, प्रत्येकाला महाराष्ट्रात काय करायचं, ते ठरवण्याचा अधिकार आहे, आणि त्यावर बोलण्याचा जैन मुनींना काहीही अधिकार नाही. शिवसेनेने कोणत्याही धार्मिक ठिकाणी चिकन शिजवलं नाही, असं सांगत, त्यांनी जैन मुनींना तिखट प्रत्युत्तर दिलं. तसेच, "शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात," हा आरोप चुकीचा असून, शिवसेनेचे प्रतिनिधी प्रत्येक नागरिकाची सेवा करत असतात, असंही चित्रे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचा उद्देश मुंबईला शांत, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्याचा आहे, असं सांगताना चित्रे यांनी भाजपावर टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की, भाजपाने विविध समुदायांमध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता एका जैन मुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण बिघडवण्याचं राजकारण सुरु केलं आहे.

चित्रे यांनी जैन मुनींना इशारा दिला की, ज्या उद्देशाने ते हिंसा आणि तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामागे भाजपाचं "use and throw" धोरण आहे. त्यामुळे मुंबईतील शांततेला धोका देणाऱ्यांना थांबवायचं आहे, असं त्यांनी म्हटले. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत म्हटले की, लालबाग परिसरात उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व आहे, आणि त्यांचं सरकार त्यांच्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाही. तसेच, त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका करत म्हटले की, जशी शिवसेना चिकनच्या मुद्द्यामुळे वाईट झाली, तसा तुमचाही हिशोब ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com