नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का; पन्नासहून अधिक पदाधिकारी शिंदे गटात

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का; पन्नासहून अधिक पदाधिकारी शिंदे गटात

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे. पन्नासहून अधिक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला हा धक्का बसला आहे. दुपारी साडेबारा एक वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

आजपासून चार दिवस आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकसह औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. यातील दोन दिवस ते नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र अशातच आज ठाकरे गटातून पन्नासहून अधिक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जातो.

यापूर्वी अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर आता आदित्य ठाकरे हे नाशिकला येत असताना जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे समजते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com