ठाणेकरांनो, घरातून बाहेर पडण्यापूर्वी 
ही बातमी वाचाच; पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

ठाणेकरांनो, घरातून बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच; पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

मुंबईत पावासाचा जोर वाढला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाणे - मुंबईत पावासाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी पाणी साचलं आहे. काही भागात भागात पावसाने रात्रीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. ठाण्याकडून मुंबईला जाणाऱ्या या पूर्व द्रूतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोढी झाली आहे. शेकडो वाहने रस्त्यावर आहेत.

सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.कामावर निघालेल्या लोकांचे चांगलेच हाल होत आहेत.ठाणे जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान विभागाने मुंबईला येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com