Thane Mayor
Thane Mayor

Thane Mayor : ठाण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज होणार औपचारिक घोषणा

महापालिका निवडणुकांचे निकाल लागले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Thane Mayor ) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आज ठाण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना कडून पिंपळोलकर गायकवाड यांची बिनविरोध महापौर पदी वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदी 11.30 वाजता ठाणे मुख्यालयामध्ये महापौर पदासाठी सर्व पक्ष नगरसेवक एकत्र येतील. त्यानंतर पहिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल आणि त्यानंतर महापौर व उपमहापौर पदाची घोषणा करण्यात येईल.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भाजपकडून कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे.

Summary

  • ठाण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज होणार औपचारिक घोषणा

  • शिवसेनेकडून शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांची महापौर पदी बिनविरोध वर्णी लागणार

  • भाजपकडून कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध वर्णी लागणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com