GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

सर्वसामान्यांसाठी काढण्यात आलेली वस्तू आणि सेवा कर प्रणाली आणखी सोपी होणार आहे. आज 21 ऑगस्ट 2025 ला मंत्रिगटाची बैठक झाली, यात जीएसटीचे चार स्लॅब हटवून दोन स्लॅब केले आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

सर्वसामान्यांसाठी काढण्यात आलेली वस्तू आणि सेवा कर प्रणाली आणखी सोपी होणार आहे. आज 21 ऑगस्ट 2025 ला मंत्रिगटाची बैठक झाली, यात जीएसटीचे स्लॅब घटवून दोन केले आहेत. म्हणजेच आता 12 टक्के आणि 28 टक्के स्लॅब रद्द केले जाणार तर 5 टक्के आणि 18 टक्क्यांचे स्लॅब राहणार आहेत.

या बैठकीत, राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी विद्यमान चार स्लॅब कमी करून फक्त दोन स्लॅब करण्यास पाठिंबा दिला आहे. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के हे सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत. यादरम्यान आज झालेल्या बैठकीत असा निर्णय घेतला आहे की, जीएसटी दर फक्त दोन स्लॅबमध्ये विभागले जातील. 12 टक्के दराने आकारण्यात येणाऱ्या वस्तू 5 टक्के दराच्या स्लॅबमध्ये येणार असून 28 टक्के दराने आकारण्यात येणाऱ्या वस्तू 18 टक्के दर कराने आकारण्यात येणार आहेत.

यामुळे कर प्रणाली अधिक सोपी होऊन याचा फायदा सामान्य लोकांना तसेच व्यापाऱ्यांना होईल. यामध्ये ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्यांच्यावर 5 टक्के दर लागू होणार असून काही मानक वस्तू तसेच सेवांवर 18 टक्के दर लागू केला आहे. त्याचसोबत मौल्यवान वस्तू आणि हानिकारक वस्तूंसाठी 40 टक्के स्लॅब आकारण्यात आला आहे.

दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देखील सांगितले की, "या नवीन प्रणालीमुळे कर प्रणाली सोपी आणि पारदर्शक होईल. तसेच, यामुळे अनेक वस्तूंवरील कर दर कमी होईल, ज्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होतील आणि सर्वसामान्यांना फायदा होईल."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com