Pandharpur :  'आषाढी यात्रेपूर्वी दगडी पुलावरील वाहतूक बंद' ; पंढरपुरकरांची प्रशासनाकडे मागणी
Pandharpur : 'आषाढी यात्रेपूर्वी दगडी पुलावरील वाहतूक बंद' ; पंढरपुरकरांची प्रशासनाकडे मागणीPandharpur : 'आषाढी यात्रेपूर्वी दगडी पुलावरील वाहतूक बंद' ; पंढरपुरकरांची प्रशासनाकडे मागणी

Pandharpur : 'आषाढी यात्रेपूर्वी दगडी पुलावरील वाहतूक बंद' ; पंढरपुरकरांची प्रशासनाकडे मागणी

पंढरपूर: आषाढी यात्रेपूर्वी दगडी पुलाची तात्काळ तपासणी व दुरुस्तीची मागणी
Published by :
Riddhi Vanne
Published on

मावळ Maval येथील कुंडमाळ Kundamaal पुलाच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असतानाच, आता अशा जुन्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या पुलांचा आणि इमारतींचा ऑडिट Audit तात्काळ करण्यात यावा, अशी जोरदार मागणी पंढरपूर येथून समोर येत आहे.

आगामी आषाढी वारी Ashadhi Wari च्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची मोठी संख्या पंढरपूर Pandharpur मध्ये दाखल होणार आहे. यापार्श्वभूमीवर, पंढरपूरमधील दीडशे वर्षांपूर्वीचा दगडी पूल हा विशेष चिंतेचा विषय ठरत आहे. आषाढी, कार्तिकी आणि चैत्र वारीमध्ये लाखो वारकरी या पुलावरून प्रवास करतात. त्यामुळे या पुलाची तात्काळ संरचनात्मक तपासणी करावी, आवश्यक असल्याने त्याची दुरुस्ती करून बाजूला बॅरिकेट्स Barricades लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक local citizens व वारकरी संघटनांकडून होत आहे.

पंढरपूरमध्ये सध्या १२७ जुन्या इमारती Old Buildings, मठ Math आणि धार्मिक वास्तू Religious Buildings आहेत. यांची देखील याच अनुषंगाने पाहणी करावी व जी इमारती धोकादायक स्थितीत आहेत, त्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे. पंढरपूरच्या नागरिकांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या संतभूमीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत.प्रशासनाकडून या मागण्यांचा गांभीर्याने विचार होईल, अशी अपेक्षा स्थानिक जनतेने व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com