Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज

लालबागचा राजा विसर्जन: तांत्रिक अडचणींनंतर शेवटी आरती संपन्न, रात्री साडेदहा वाजता विसर्जन.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

यंदा विसर्जनावेळी तांत्रिक अडचणींमुळे सोहळा काही तास लांबला

विसर्जनस्थळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत मुकेश अंबानी पोहोचले आहेत.

लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न

लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेला लालबागचा राजा आज निरोप घेत आहे. मात्र यंदा विसर्जनावेळी तांत्रिक अडचणींमुळे सोहळा काही तास लांबला. समुद्रातील भरती आणि नव्या तराफ्यावर मूर्ती चढवताना आलेल्या अडथळ्यांमुळे विसर्जन वेळेत होऊ शकले नाही. अखेर आता रात्री साडेदहा वाजता विसर्जन पार पडणार आहे.

यंदा विसर्जनासाठी अत्याधुनिक मोटराइज्ड तराफा आणण्यात आला होता. 360 अंशात फिरण्याची क्षमता आणि स्प्रिंकलर्समुळे सोहळ्याला भव्य स्वरूप लाभणार होतं. पण पाण्याची पातळी जास्त असल्याने अडचण निर्माण झाली आणि विसर्जन थांबवण्यात आलं. त्यानंतर पारंपरिक तराफ्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोळी बांधवांच्या मदतीने मूर्ती विसर्जनासाठी सज्ज आहे.

दरम्यान, विसर्जनस्थळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत मुकेश अंबानी पोहोचले होते. त्यांनी स्वतः उपस्थित राहून व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे स्थळावर विशेष आकर्षण निर्माण झालं.

काही वेळा पूर्वीच शेवटची आरती मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली असून, अनेक भाविक या क्षणी भावनिक झाले. भरतीची वेळ रात्री साडेदहा वाजता असल्याने अवघ्या काही तासांत लालबागचा राजा भक्तांना निरोप देणार आहे. भाविकांचा जयघोष आणि डोळ्यांत पाणी घेऊन झालेला निरोप हा सोहळा यंदाही अविस्मरणीय ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com