रामनवमी मिरवणुकीदरम्यान जातीय तणाव निर्माण करणाऱ्या कथित आरोपीने केली उच्च न्यायालयात याचिका

रामनवमी मिरवणुकीदरम्यान जातीय तणाव निर्माण करणाऱ्या कथित आरोपीने केली उच्च न्यायालयात याचिका

रामनवमी मिरवणुकीदरम्यान जातीय तणाव निर्माण करणाऱ्या कथित आरोपीने केली उच्च न्यायालयात याचिका
Published by :
Siddhi Naringrekar

रिध्देश हातिम, मुंबई

मालाड मालवणी मध्ये रामनवमी दरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या जातीय तणावामुळे गुन्हा दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्यासाठी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. मालाड मालवणीमध्ये रामनवमीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांचाही समावेश असून, त्यांनी उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

मर्चंट यांनी या प्रकरणात सहभाग असल्याचे खंडन याचिकेतून केले आहे. मालवणीमध्ये निर्माण झालेली तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी मी पोलिसांना मदत करत होतो, मी कोणालाही चिथावणी दिली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाने याचिकेवर उन्हाळी सुटीनंतर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान मर्चंट यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com