PM Modi On Pahalgam Attack : "Operation Sindoor द्वारे दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले"
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला केवळ भारतावर हल्ला नव्हता तर मानवता आणि बंधुत्वावर हल्ला होता.असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दहशतवाद्याने भारतातील अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. त्यांनी भारताचे विभाजन करण्याचा कटही रचला. पण संपूर्ण जग पाहत आहे की भारत पूर्वीपेक्षा किती एकसंध आहे. आम्ही एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले "सिक्कीममधील सर्व लोक पर्यटनाची शक्ती चांगल्या प्रकारे समजून घेतात. पर्यटन हे केवळ मनोरंजन नाही तर विविधतेचा उत्सव देखील आहे. पण पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे केले ते केवळ भारतावर हल्ला नव्हता तर मानवता आणि बंधुत्वावर हल्ला होता. दहशतवाद्याने भारतातील अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. त्यांनी भारताचे विभाजन करण्याचा कटही रचला. पण संपूर्ण जग पाहत आहे की भारत पूर्वीपेक्षा किती एकसंध आहे. आम्ही एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले. रागाच्या भरात पाकिस्तानने आमच्या नागरिकांवर आणि सैन्यावर हल्ला केला. त्यांचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त करून, आम्ही त्यांना दाखवून दिले की भारत किती अचूक आणि वेगाने कारवाई करू शकतो."