ताज्या बातम्या
नागपूरात लागले नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला.
लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. यातच आता नागपूरात नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची आता चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस असून महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर हे बॅनर लावण्यात आले. नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय.