CBSE Result : CBSE बारावीचा निकाल जाहीर! कुठे पाहता येणार निकाल, जाणून घ्या
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा एकूण 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर तसेच डिजीलॉकर, उमंग अॅप आणि SMS सेवेद्वारे तपासता येणार आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला 17.88 लाख विद्यार्थी बसले होते. दहावी आणि बारावी मिळून एकूण 42 लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2025 दरम्यान झाली.
CBSE ने यंदाही गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर केलेली नाही. कोणताही टॉपर घोषित करण्यात आलेला नाही. मंडळाने सर्व शाळा आणि संस्थांना कोणत्याही विद्यार्थ्याला टॉपर घोषित न करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक स्पर्धा टाळता येईल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी डिजीलॉकर, उमंग अॅप किंवा CBSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.
मात्र, ही गुणपत्रिका तात्पुरती असते. मूळ गुणपत्रिका संबंधित शाळेतूनच मिळेल आणि तीच पुढील शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रियांसाठी वैध असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी cbse.gov.in, cbseresults.nic.in, results.cbse.nic.in आणि results.gov.in यासारख्या अधिकृत वेबसाइटना भेट देऊन त्यांचे गुण तपासू शकतात.