National Film Awards : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर! 'या' मराठी सिनेमाने पटकावला पुरस्कार,  विजेत्यांची यादी जाणून घ्या

National Film Awards : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर! 'या' मराठी सिनेमाने पटकावला पुरस्कार, विजेत्यांची यादी जाणून घ्या

71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, 'शामची आई' ने मराठी सिनेमा पुरस्कार जिंकला. विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या.
Published by :
Prachi Nate
Published on

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे हे 71वे वर्ष होते. सर्वात मानाचा आणि बहुप्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार सोहळा 1 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टीला कन्नड ब्लॉकबस्टर ‘कांतारा’मधील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

यावर्षी पार पडलेल्या सोहळ्याला मागच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि सिनेसृष्टीमधील प्रतिभावान लोक उपस्थित होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

विजेत्यांची यादी पुढील प्रमाणात:

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री पुरस्कार- गॉड वल्चर अँड ह्युमन

सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म पुरस्कार - टाइमलेस तमिळनाडू

सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म पुरस्कार - भागावान्थ केसरी

सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म पुरस्कार - पार्किंग

सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म पुरस्कार - गॉडडे गॉडडे चा

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा पुरस्कार - शामची आई

सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा पुरस्कार - कथल

सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा पुरस्कार - वश

सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा पुरस्कार - डीप फ्रीजर

सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा पुरस्कार - हनूमान

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी पुरस्कार - वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)

सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक पुरस्कार - हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन पुरस्कार - अॅनिमल

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार - प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल पुरस्कार - शिल्पा राव

सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार पुरस्कार - कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार - उर्वशी, जानकी बोडीवाला

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार - राणी मुखर्जी

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार - शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल

सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा पुरस्कार - नाळ २

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com