SSC & HSC Result 2025 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दोन्ही विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख ठरली

SSC & HSC Result 2025 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दोन्ही विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख ठरली

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख ठरली असून मेच्या या तारखेला दहावी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेली, तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेली. परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील 15 मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. बारावीच्या विद्याध्यर्थ्यांचा आयटी विषयाचा पेपर राहिला असून 17 मार्चला परीक्षा संपणार आहे.

दरम्यान, उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्याथ्यर्थ्यांचे निकाल 15 मेपूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकालही लवकर लागेल असे, शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

निकालाची अधिकृत तारीख अजून बोर्डाने जाहीर केलेली नाही पण बारावीचा निकाल हा मे महिन्यातच लागणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. यामागचं कारण असं की, पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात सुरू होते. त्यामुळे 15 मे दरम्यान बारावीचा निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तसेच दहावीच्या विद्याथ्यर्थ्यांचा निकाल देखील 17 किंवा 18 मे दरम्यान लागण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com