Pune : पुण्यात भाजप-शिवसेना वाद; मोहोळ-धंगेकर वादामुळे राजकीय तापमान वाढले
Pune : पुण्यात भाजप-शिवसेना वाद; मोहोळ-धंगेकर वादामुळे राजकीय तापमान वाढलेPune : पुण्यात भाजप-शिवसेना वाद; मोहोळ-धंगेकर वादामुळे राजकीय तापमान वाढले

Pune : पुण्यात भाजप-शिवसेना वाद; मोहोळ-धंगेकर वादामुळे राजकीय तापमान वाढले

पुण्यात महायुतीतील भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यातील वाद काही थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • पुण्यात महायुतीतील भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यातील वाद काही थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

  • पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार संबंधी हा वाद हा एकमेकांच्या व्यक्तिगत पातळीवर गेला आहे.

  • जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले होते.

पुण्यात महायुतीतील भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यातील वाद काही थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार संबंधी हा वाद हा एकमेकांच्या व्यक्तिगत पातळीवर गेला आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले होते, मात्र त्यांनी व्यवहारात गोखले बिल्डरशी काहीच संबध नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर ज्या गोखले बिल्डरची एका बांधकाम इमारतीची जाहिरात मुरलीधर मोहोळ यांनी केल्याचा व्हिडियो रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियात व्हायरल केला होता. दरम्यान गोखले आणि मोहोळ यांचे संबंध नाही असे मोहोळ सांगतात तर गोखले याची जाहिरात का करत आहेत? असा सवाल त्यांनी केला यावर भाजपकडून रविंद्र धंगेकर यांना प्रयुत्तर देण्यात आले.

पुण्यातील एका नामांकित कपड्याव्या दुकानात जाऊन रवींद्र धंगेकर जाहिरात केली होती. याचा व्हिडिओ भाजपकडून व्हायरल झाला. नामांकित कपड्यांच्या कंपनीचा आणि धंगेकरांचा काय संबंध असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. आहे. यावरुन पुण्यातील राजकारण कोणत्या स्तराला गेल आहे हे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीत अण्णा विरुद्ध भाऊ असा सामना रंगला होता ज्यामध्ये मोहोळ यांनी धंगेकरांना धुळ चारली. त्या पराभवाचा वचपा धंगेकर अजूनही मोहोळ यांच्याकडून काढत आहे का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

निलेश घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर आरोपांची राळ उठवणारे धंगेकर अचानक मोहोळ यांच्या ट्रैक वर येऊन बसले आहेत आणि रोज मोहोळ यांच्या विरोधात नवनवीन आरोप करत आहेत. समीर पाटील यांनी धंगेकर यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केल्यानंतर धंगेकर यांचा पाटील विरोधातला रोष मावळला असा आरोप होत आहे तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट अंगावर घेण्याचं काम करत आहेत.

राज्यात भाजप शिवसेना हे महायुतीत एकत्र आहेत असे असले तरी पुण्यात मात्र शिवसेनेचे रवींद्र धंगेकर हे युती धर्म पाळताना दिसत नाही. अर्थात धंगेकरांनी चंद्रकात पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर करत असलेले आरोप हे आगामी काळात कुणाच्या फायद्याचे आणि नुकसानीचे ठरवत हे पाहाव लागणार आहे मात्र पुण्यात भाजप आणि शिवसेनेचे रविंद्र धंगेकर यांच्यात जाहिरातीतून मात्र जोरदार वाद सुरू झालाय.यात आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लक्ष घालून वाद मिटवणार का याकडे ही लक्ष असणार आहे .तो पर्यंत धंगेकर अजून काय काय फटाके फोडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com