Shivshastra Exhibition : कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन ; अशिष शेलार करणार उद्घाटन
राज्य सांस्कृतिक विभागाने आयोजित शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शाचे उद्घाटन आज मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.45 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांचा समाविष्ट आहे. प्रदर्शन ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथे होईल आणि वाघनखे ३ मे २०२६ पर्यंत कोल्हापूर येथे ठेवली जातील.
कोल्हापूर येथील कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबीटकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुटुंबीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असेल.
वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच त्यांना प्रदर्शनात प्रवेश दिला जाईल, आणि सर्वत्र सीसीटीव्ही देखरेखीची व्यवस्था केली आहे.
