Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीच्या लग्नाचा शाही थाट! हगवणेंची सून होण्यासाठी कस्पटेंची मोजले तब्बल दीड कोटी, खर्चाचा तपशील पाहून व्हाल अवाक्
पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहित महिलेचा मृत्यू झाला. 16 मे 2025 रोजी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. पती, सासू-सासरे तसेच नणंदकडून तिचा छळ केला जायचा, असा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. आता वैष्णवीच्या लग्ननाचा खर्च समोर आला आहे. तिच्या वडिलांना तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यासाठी भाग पाडल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश रक्कम ही बडेजाव दाखवण्यासाठी खर्च करण्यात आला आहे.
लग्नासाठी 10 लाख रुपये भाडं असलेलं आलिशान रिसॉर्ट,
लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर तब्बल 22 लाखांचा खर्च,
पाच हजार पाहुण्यांना जेवणाचं निमंत्रण
एक हजार रुपये प्लेटप्रमाणे जेवणाचा खर्च 50 लाख रुपये
पाहुण्यांचा सत्कार आणि कपड्यांवर लाखोंचा खर्च
लग्नाचं संपूर्ण नियोजन इव्हेंट मॅनेजमेंटकडे.
हगवणे कुटुंबीयांना हुंड्यात 51 तोळे सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर गाडी