Dharashiv : देवी तुळजाभवानी जागल्या अन् सुरू झाला नवरात्रीचा पहिला दिवस
तुळजापुरातील तुळजा भवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सुरुवात
देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी; विशेष सोयीसुविधांची व्यवस्था.
नऊ दिवस पूजा, हवन, धार्मिक विधी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील तुळजा भवानी देवीच्या दर्शनाला सुरुवात झाली असून, तुळजा भवानी देवी हे स्थानिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी देवी विश्रांतीत असतानाही भक्तांना दर्शन मिळेल यासाठी विशेष सोय केली जाते. पहाटे देवीला जागवून पूजा आणि आरती करून नवरात्रोत्सवाचे विधी संपन्न केले जातात.
धाराशीव मधील तुळजापुरात शारदीय नवरात्राची महोत्सवाची सुरुवात होत असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली आहे. दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरात देवीची घटस्थापना होईल. आई तुळजाभवानीने महीषासुराचा वध केल्यामुळे आणि या नऊ दिवसामध्ये तुळजाभवानीचे आणि महीषासुराचे जे युध्द झाले त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी नवरात्राची सांगता होऊन, देवीची यात्रा तुळजापुरातील संपन्न होते. देवी मंचकी निद्रा संपून पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापीत होते.
घटस्थापना होऊन कलेक्टर साहेबांच्या हस्ते प्रतिपदापासून नवमीपर्यंत ब्राह्मणाला वर्णी दिली जाते. विधी झाल्यानंतर अष्टमी दिवशी हवन केल जाते. नवरात्रोत्सव हा प्रत्येक वर्षी आश्विन महिन्यात साजरा केला जातो आणि हा देवीच्या नऊ रूपांना समर्पित असतो. या उत्सवात भक्त उपवास करतात, देवीची पूजा करतात, आणि गरबा, दांडिया यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. हे नऊ दिवस भक्तांसाठी आध्यात्मिक शांती व आनंदाचे आहेत.