येत्या 14 मार्चला सरकार कोसळणार नाही, तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार - चंद्रशेखर बावनकुळे

येत्या 14 मार्चला सरकार कोसळणार नाही, तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार - चंद्रशेखर बावनकुळे

येत्या 14 मार्चला सरकार कोसळणार नाही. तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

येत्या 14 मार्चला सरकार कोसळणार नाही. तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. सरकारने तोंडाला पानं पुसली. केवळ घोषणांचा पाऊस पाडला. तसेच सरकार लवकरच कोसळणार असल्याचे देखिल विरोधकांकडून बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, येत्या 14 मार्च रोजी सरकार कोसळणार नाही. तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. पक्ष प्रवेशाचे मोठे भूकंप राज्यात बसणार आहेत. असे बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com