Cold Play च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 'इतक्या' लाखांची भर
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय होता तो म्हणजे 'कोल्ड प्ले'चे तिकीट्स. बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत ‘कोल्ड प्ले’ या जगप्रसिद्ध ब्रिटिश ब्रँडचा कार्यक्रम १८,१९ आणि २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नवी मुंबईमध्ये होणार आहे. महागड्या तिकीट्सवरून चर्चेत आलेला हा कॉन्सर्टमुळे आता सरकारच्या तिजोरीत लक्षावधींची भर पडणार आहे.
सरकारच्या तिजोरीत ६० ते ६५ लाखांची भर
नेरूळमध्ये होणाऱ्या कोल्ड प्ले आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत ६० ते ६५ लाखांची भर पडणार आहे. कार्यक्रमासाठी ८०० ते हजार पोलिस बंदोबस्त पुरवला जाणार आहे. हा बंदोबस्त सशुल्क असल्याने त्या माध्यमातून शासनाला हे शुल्क मिळणार आहे. नेरूळ येथे डी. वाय. पाटील स्टेडियमवर'कोल्ड प्ले' या आंतरराष्ट्रीय बँडचा आवाज घुमणार आहे. बँडचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी शौकिनांचे नवी मुंबईला पाय लागणार आहेत. त्यात देशभरातील तसेच देशाबाहेरून येणाऱ्यांचीही संख्या मोठी असणार आहे.
तिकीट विक्रीवरून उडाला होता गोंधळ
नवी मुंबईत होणाऱ्या या कोल्ड प्लेच्या तिकीट विक्रीवरून बरंच वादळ उठलं होतं. सप्टेंबर २०१४ पासून जानेवारीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरु झाली होती. ऑनलाईन तिकीट विंडो ओपन होताच काही मिनिटांतच सर्व तिकिटे बुक्ड झाली होती. अनेक चाहत्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे तरूणांनी समाजमाध्यमांवर मिम्स, रिल्स, स्टोरी, स्टेटस आणि पोस्टच्या माध्यमातून 'कोल्ड प्ले' च्या तिकीटावरून आपली निराशा व्यक्त केली होती.
५० हजार ते १ लाखांहून अधिक रुपयांची तिकीटं
या तिकिटांची किंमत ५० हजार ते १ लाखांहून अधिकपर्यंत सांगण्यात येत होती. यासंदर्भातील काही मेसेज व स्क्रीनशॉट्स समाजमाध्यमांवर फिरत होते. या कार्यक्रमाच्या तिकिटांची किमान किंमत ही २ हजार ५०० रुपये तर कमाल किंमत ही तब्बल ३५ हजार रुपये आहे. व्यासपीठ आणि आसनव्यवस्थेमधील अंतर तसेच इतर सोयीसुविधांनुसार तिकिटांची वेगवेगळी किंमत आहे. ‘कोल्ड प्ले’ या कार्यक्रमाच्या तिकिटांची रक्कम ही अडीच हजार, साडे तीन हजार, ४ हजार, साडे ४ हजार, ६ हजार ४५०, ९ हजार, साडे १२ हजार आणि तब्बल ३५ हजार इतकी आहे. ज्यांना ऑनलाईन तिकीट विक्री संकेतस्थळावरून तिकीट मिळाले, त्यापैकी काहींनी अधिक किंमतीत ऑफलाईन पद्धतीने तिकीटे विकली.
काय आहे कोल्ड प्ले?
कोल्डप्ले हा एक ब्रिटिश रॉक बँड आहे. १९९६ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये या बँडची स्थापना करण्यात आली होती. गायक क्रिस मार्टिन आणि गिटार वादक जॉनी बकलँड यांनी या बँडची स्थापना केली होती. गाय बेरीमन, विल चॅम्पियन आणि फिल हार्वी असे या बँडचे सदस्य आहेत. जे तरूणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
पॅराशूट्स, अ रश ऑफ ब्लड टू द हेड, एक्स अँड वाय, व्हिवाला व्हीदा किंवा डेथ अँड ऑल हिस फ्रेंड्स, मायलो झायलोटो, घोस्ट स्टोरीझ, अ हेड फुल ऑफ, ड्रीम्स, एव्हरीडे लाईफ हे 'कोल्ड प्ले'चे काही प्रसिद्ध अल्बम्स आहेत.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-