'हर घर तिरंगा’ मोहिमेला उत्साहात सुरुवात, शोभायात्रांसह, कार्यक्रमांचे आयोजन

'हर घर तिरंगा’ मोहिमेला उत्साहात सुरुवात, शोभायात्रांसह, कार्यक्रमांचे आयोजन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असे आवाहन केले आहे. तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवावा किंवा प्रदर्शित करा आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या फोटोंवर भारतीय तिरंगा लावा असे आवाहन केले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अनेक राज्यांमध्ये तिरंगा यात्रा आणि प्रभात फेऱ्या काढून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. त्यांत राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपल्या दिल्लीतील घरावर शनिवारी राष्ट्रध्वज फडकावला. तिरंगा फडकवताना ते म्हणाले की, तिरंगा हा आमचा अभिमान आहे. तो देशवासीयांना एकत्र आणतो आणि प्रेरणा देत राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी माझ्या नवी दिल्लीतील निवासस्थानी तिरंगा फडकवला आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरांना आदरांजली वाहिली.

तसेच वयाच्या शंभरीत प्रवेश केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांनी शनिवारी गुजरातमधील गांधीनगर शहराच्या उपनगरातील आपल्या निवासस्थानी लहान मुलांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले. तिरंगा हा देशाचा सन्मान आणि गौरव असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवासीयांना घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला. मुंबईतील २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोषणाई केली आहे. त्यांत पालिकेच्या इमारती, राज्य सरकारी इमारती, खासगी इमारतींचा समावेश आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातील सलग २८ इमारतींवर तिरंगी रोषणाई करण्यात आली असून चित्रपटगृहातून चित्रपटांच्या प्रारंभी आणि मध्यंतरावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची चित्रफित दाखविण्यात येत आहे.

'हर घर तिरंगा’ मोहिमेला उत्साहात सुरुवात, शोभायात्रांसह, कार्यक्रमांचे आयोजन
'हर घर तिरंगा': 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत गुजरातमध्ये फडकणार एक कोटी राष्ट्रध्वज, हे ठिकाण असेल खास
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com