Farmer suicide : शेतकरी आत्महत्येचं भयान वास्तव, 11 महिन्यांमध्ये पश्चिम विदर्भात 973 शेतकरी आत्महत्या
11 महिन्यांत तब्बल 973 शेतकरी आत्महत्या; कृषी संकटाची राज्याला गंभीर जाणीव करून देणारा धक्कादायक अहवाल पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या छायेत आहे. गेल्या 11 महिन्यांत तब्बल 973 शेतकऱ्यांनी जगण्याचा संघर्ष हरवत जीव दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातत्याने होत असलेले अतिवृष्टी–दुष्काळाचे चक्र, पीकनुकसान, वाढलेले उत्पादनखर्च, कर्जबाजारीपणा आणि हमीभावाचा अभाव यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडत असल्याची गंभीर परिस्थिती उघड झाली आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विदर्भातील संकट अधिकच तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी तज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आगामी काळात ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कर्जमाफी, भरपाई, हमीभाव, सिंचन व्यवस्था आणि तातडीच्या आर्थिक मदतीसह दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरत आहे. ही आकडेवारी फक्त संख्या नसून प्रत्येक घरातील विघटलेली कुटुंबव्यवस्था, उद्ध्वस्त आयुष्य आणि विझलेल्या आशा दर्शवणारी हृदय पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती आहे.
