Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'निरोप घेतो आता आज्ञा असावी..., 33 तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न
काल दुपारी 12.00 वाजता लालबागच्या मिरवणुकीला सुरुवात केली होती. लालबागच्या राजाला मंडपातून बाहेर काढण्यात आले होते.
लालबागचा राजा आता लालबाग मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मार्गस्थ झाला होता.
लालबागला एकप्रदक्षिणा घातल्यानंतर श्रॉफ बिल्डिंगच्या दिशेनं बाप्पा मार्गस्थ होणार असून श्रॉफ बिल्डिंगची मानाची पुष्पवृष्टी करण्यात येणार आली होती.
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी होते.
राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
सकाळी 7.00 वाजता लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी झाली होती.
नव्या मोटराइज्ड तराफ्यावर मूर्ती चढवताना समुद्रातील भरतीमुळे मोठा अडथळा आला होता.
त्यामुळे विसर्जनाला विलंब झाला.
काहीवेळा पूर्वीच शेवटची आरती मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली असून, अनेक भाविक या क्षणी भावनिक झाले.
विसर्जनस्थळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत मुकेश अंबानी पोहोचले होते.
नुकतेच नऊ तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाचे विसर्जन झाले आहे.